'...तर त्रिपुरातील चिटफंड कंपन्यांची CBI चौकशी करू'
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ: '...तर त्रिपुरातील चिटफंड कंपन्यांची CBI चौकशी करू'

भारतीय जनता पक्षाचे त्रिपुरा राज्य प्रभारी सुनील देवधर यांनी त्रिपुरामध्ये भाजपचे सरकार आल्यास 10 दिवसांच्या आत सर्व चिटफंड कंपन्यांची CBIद्वारे चौकशी करू, असं म्हटलं आहे.

बीबीसी प्रतिनिधी सलमान रावी यांच्याशी बोलताना ते म्हणाले, लोकांना त्रिपुरामध्ये गरीब मुख्यमंत्री नको आहे. लोकांना गरिबी दूर करणारा मुख्यमंत्री पाहिजे. त्रिपुरामध्ये बेरोजगारी वाढत चालली आहे. आदिवासी लोकांची मातृभाषा कॉकबरोक भाषेसाठी एकही शिक्षक नियुक्त केलेला नसल्याचं देवधर म्हणाले.

यंदा त्रिपुरामध्ये 'मोदी सरकार' विरुद्ध माणिक सरकार , असं चित्र निवडणुकीत पाहायला मिळालं.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)