पाहा व्हीडिओ : हे किडे-मुंग्यांचं बर्गर भविष्यात सगळेच खातील का?
पाहा व्हीडिओ : हे किडे-मुंग्यांचं बर्गर भविष्यात सगळेच खातील का?
युरोपातल्या एका मोठ्या सुपरमार्केट चेननं किडे-मुंग्यांचे खाद्यपदार्थ विक्रीस ठेवण्यास सुरुवात केली आहे. यामुळे युरोपच्या मासांहारी खाद्यसंस्कृतीत मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतल्या अनेक देशांमुळे किड्यांचा खाद्यपदार्थांत समावेश आहे. मात्र युरोपात ते खाद्यपदार्थांत असण्याची ही पहिलीच वेळ आहे.
किड्यांमध्ये प्रोटीन आणि पोषक तत्त्व जास्त असून त्यांचं उत्पादन खर्चही आटोक्यातला आहे. त्यामुळे किड्यांचा अन्नात समावेश हा भविष्यातला संपूर्ण जगातला ट्रेंड ठरेल का, हा प्रश्न पुढे येऊ लागला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)