पाहा व्हीडिओ - सप्तखंजिरी वाजवत गाडगेबाबांचा संदेश पोहोचवणारे सत्यपाल

पाहा व्हीडिओ - सप्तखंजिरी वाजवत गाडगेबाबांचा संदेश पोहोचवणारे सत्यपाल

गाडगेबाबांच्या विचारांनी प्रभावित झालेले सत्यपाल चिंचोलीकर गावच्या पारावर सप्तखंजिरी वाजवून लोकांना जमा करतात आणि स्वच्छतेचा संदेश देतात.

लोक त्यांना 'सत्यपाल महाराज' म्हणून ओळखतात. केवळ कीर्तनातून गाडगेबाबांचा स्वच्छतेचा संदेश न देता ते स्वत: झाडू घेऊन गाव साफ करतात. लहानपणापासून संत तुकडोजी आणि गाडगेबाबा यांच्या विचारांचा प्रभाव असल्याचं त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

कीर्तनातून स्वच्छता, व्यसनमुक्ती, घनकचरा नियोजन, जातिभेद, अंधश्रद्धा, शिक्षणाचं महत्त्व, हगणदारी मुक्त गाव, स्त्री भ्रूण हत्या या विषयी जागरुकता निर्माण करतो, असं चिंचोलीकर सांगतात.

व्हीडिओ स्टोरी - अमेय पाठक, एडिटिंग - गणेश पोळ

हेही पाहिलत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)