पाहा व्हीडिओ : हे आहे जगातलं सर्वांत दुर्गम चर्च

इथिओपियामधल्या दूरवरच्या घेराल्ताच्या डोंगररांगामध्ये 6व्या शतकात या चर्चची स्थापना करण्यात आली आहे. या चर्चमध्ये हेलसायलाअॅसी काहसे हे पादरी दररोज 2 तासांचा ट्रेक करून जातात.

शतकांपासून ही परंपरा चालत आली असून आतापर्यंत झालेल्या पादरींचे अंत्यसंस्कारही याच डोंगरात झाले आहेत. चर्चपर्यंत चढून जाण्याचा मार्ग खडतर असला तरी अजूनपर्यंत खाली दरीत पडून कुणाचाही इथे मृत्यू झालेला नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)