पाहा व्हीडिओ - तैवानमध्ये आहे मंदिरांचा काखाना!
पाहा व्हीडिओ - तैवानमध्ये आहे मंदिरांचा काखाना!
तैवानमध्ये खूप बुद्ध मंदिरं आहेत. नवनवीन मंदिरं अजूनबी बांधली जात आहेत. पारंपरिक मंदिरं बांधण्यासाठी खूप वेळ आणि पैसा मोजावा लागतो. म्हणून तैवानमधील या कारागीराने मंदिरं बांधण्याचा कारखानाच सुरू केला आहे.
तैवान हा देश विदर्भापेक्षा लहान आहे आणि या ठिकाणी किराणा दुकानांपेक्षा मेदिरंच जास्त आहेत. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून नक्षीदार मंदिर अवघ्या काही आठवड्यातच उभारलं जातं. जगभरातून या झटपट मंदिरांसाठी मागणी येत आहे.
पण, या तंत्रज्ञानामुळं कलात्मकतेला तडा जात आहे, असं काही लोकांचं म्हणणं आहे. त्यांच्या मते हे नवं तंत्रज्ञान वर्षानुवर्षं चालत आलेल्या मंदिर हस्तकलेची जागा घेऊ शकत नाही.
हे पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)