पाहा व्हीडिओ ...यामुळे आफ्रिकेतल्या या छोट्या देशात अर्भक मृत्युदर कमी झाला

पाहा व्हीडिओ ...यामुळे आफ्रिकेतल्या या छोट्या देशात अर्भक मृत्युदर कमी झाला

आफ्रिकेतल्या विकसनशील देशांत बालमृत्युंचं प्रमाण मोठं आहे. पण मालावी या छोट्या देशात अर्भक मृत्युदर कमी झाला आहे. वैद्यकीय सुविधांमुळे मालावीतल्या बाळांचं वाचण्याचं प्रमाण 90% झालं आहे. यासाठी तीन मार्गांचा अवलंब करण्यात आला आहे.

हे कोणते तीन मार्ग ते पाहण्यासाठी बघा हा व्हीडिओ.

1. प्रसूतीपूर्व वैद्यकीय मदत - यासाठी प्रसूतीदरम्यान अतिरक्तस्राव होऊ शकतो. हे टाळण्यासाठी हॉस्पिटलमध्ये इंजेक्शन्स दिली जातात. तसंच इतर मदतीसाठी डॉक्टर उपलब्ध असतात.

2. नवमातांना मदत - मालावीतले 80% लोक आरोग्य सेवांपासून दूर ग्रामीण भागात राहतात. अशा वेळी आरोग्यसेविका नवमातांसाठी लाईफलाईन ठरल्यात.

3. कांगारू पद्धत - बालविवाहामुळे अनेकदा कमी वयात महिलांची प्रसूती होते. त्यामुळे ही मुलं नाजूक असतात. नाजूक बालकांना ऊब देण्यासाठी बॉडी हीटचा वापर शिकवला जात आहे. या तीन मार्गांमुळे मालावीतल्या अर्भक मृत्यूदराचं प्रमाण कमी झालं आहे.

कसा करतात हा वापर- पाहा व्हीडिओ.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)