पाहा व्हीडिओ : या सीलच्या गळ्यात फ्रिस्बी अडकली अन् तिचं नावंच पडलं 'फ्रिस्बी'!

पाहा व्हीडिओ : या सीलच्या गळ्यात फ्रिस्बी अडकली अन् तिचं नावंच पडलं 'फ्रिस्बी'!

या मादी सीलच्या गळ्यात खेळण्याची फ्रिस्बी अडकल्यानं ती गंभीर जखमी झाली होती. इंग्लंडमधल्या नॉरफोक इथल्या किनाऱ्यावर ती गळ्यात फ्रिस्बी अडकलेल्या स्थितीत आढळली होती.

तिच्यावर युकेमधल्या वाईल्ड लाईफ सेंटरमध्ये सलग सात महिने उपचार केल्यानंतर तिचा जीव वाचला. गळ्यात फ्रिस्बी अडकल्यानं तिचं नावच फ्रिस्बी ठेवण्यात आलं.

आणि आता ती आनंदात आपल्या अधिवासात जगत आहे.

तुम्ही ही क्विझ सोडवलीत का?

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)