TISS मधले विद्यार्थी का गेलेत संपावर?

TISS मधले विद्यार्थी का गेलेत संपावर?

टाटा इन्स्टिट्यूटमध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमातीच्या (ST) विद्यार्थ्यांना आतापर्यंत होस्टेल आणि मेसच्या फीमध्ये सवलत मिळत होती. त्यामुळे नाममात्र दरात गरिबातील गरीब मुलांना शिक्षण घेणं शक्य होतं. मात्र आता ही सवलत बंद करण्यात आली आहे. त्यामुळेच टाटा इन्स्टिट्यूटमध्ये शिकणारे विद्यार्थी 20 फेब्रुवारीपासून आंदोलन करत आहेत. विद्यार्थ्यांनी संप पुकारला असून वर्गात न बसता त्यांनी संस्थेच्या दारात ठाण मांडलं आहे.

या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी टाटा इन्स्टिट्यूटचं व्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांमध्ये चर्चेच्या फेऱ्या झाल्या आहेत. मात्र यातून काहीही तोडगा निघू शकला नाही.

TISSप्रकरणी केंद्र सरकारच्या वतीने सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. ते म्हणाले, "मी याप्रकरणी माहिती घेतली आहे. विद्यार्थ्यांशी यासंदर्भात चर्चा केली आहे. कोणत्याही विद्यार्थ्याचं शिक्षण थांबू नये असा आमचा प्रयत्न आहे आणि युजीसीच्या निकषांमुळे जर टिसकडून ही सवलत काढून घेण्यात आली असेल, तर UGCच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यावर तोडगा काढण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत."

स्टोरी - अभिजीत कांबळे, शूट एडिट - विष्णू वर्धन.

हे पाहिलंत का?