पाहा व्हीडिओ : 99 वर्षांच्या स्विमर आजोबांचा नवा विश्वविक्रम

पाहा व्हीडिओ : 99 वर्षांच्या स्विमर आजोबांचा नवा विश्वविक्रम

ऑस्ट्रेलियाच्या या 99 वर्षं वयाच्या स्विमरने 50 मीटर फ्री स्टाइलमध्ये त्यांच्या वयोगटात जागतिक विक्रम नोंदवला आहे.

जॉर्ज कोरोन्स यांनी क्वीन्सलँडमध्ये हा विक्रम केला. 50 मीटरचं अंतर त्यांनी 56.12 सेंकदांमध्ये कापलं. 2014 मध्ये नोंदवण्यात आलेला जागतिक विक्रम मोडायला त्यांना 35 सेकंद कमी लागले.

आता या विक्रमाची क्रीडा प्रशासकीय संस्थेतर्फे पडताळणी केली जाईल.

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)