पाहा व्हीडिओ : पाकिस्तानात मगरींना हार का घालत आहेत?

पाहा व्हीडिओ : पाकिस्तानात मगरींना हार का घालत आहेत?

पाकिस्तानात एका उत्सवात लोक मगरींना हार घालत आहेत. पण का?

पाकिस्तानातील मंगोफिर वस्तीतले शीदी लोक मगरींना पवित्र मानतात. म्हणून या वार्षिक उत्सवात मगरींना हार घातले जातात.

सात वर्षांच्या खंडानंतर यंदा हा उत्सव नुकताच गेल्या महिन्यात पार पडला.

शीदी समुदायाचे हे लोक मूळ आफ्रिकन वंशाचे समजले जातात. या समुदायाचे मुख्य धर्मगुरू सुफी संत मंघो पीर यांच्या कराचीमधल्या स्मृतिस्थळी हा उत्सव दरवर्षी आयोजित केला जातो.

या मगरींमध्ये संतांची दिव्य शक्ती आहे, अशी शीदींची श्रद्धा आहे. या मगरी संतांच्या काळातील मगरींच्या वंशज असल्याचं ते मानतात.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)