'आता गोळी खावी लागली तरी चालेल, पण आम्ही आमचा हक्क मिळवूच'
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : 'आता गोळी खावी लागली तरी चालेल, पण आम्ही आमचा हक्क मिळवूच'

6 मार्च रोजी नाशिकहून हजारो शेतकरी चालत मुंबईला पोहोचले. 12 तारखेला विधानभवनला ते घेराव घालणार आहेत. त्या अनेक शेतकऱ्यांपैकी एक आहेत धर्मा शिंदे.

"आम्ही आमच्या हक्कांसाठी लढत आहोत. आता लाठ्या खाव्या लागल्या तरी चालेल, गोळी खावी लागली तरी चालेल पण आम्ही आमचा हक्क मिळवूनच राहू," असं शिंदे यांनी सांगितलं.

"आमच्या कुटुंबात सर्वजण शिकले सवरलेले आहेत पण कुणालाच नोकऱ्या नाहीत. माझ्या पत्नीचं D.Ed. झालं आहे पण तिला देखील नोकरी नाही. मुलं इंजिनिअर झाली त्यांना देखील नोकऱ्या नाही. जमीन सावकाराकडे आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही कसं जगणार?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

रिपोर्टिंग,शूट आणि एडिट: राहुल रणसुभे

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)