#BBCShe - काय आहे #BBCShe?

#BBCShe - काय आहे #BBCShe?

#BBCShe हा एक असा प्रोजेक्ट आहे ज्यातून वाचक, महिला वाचक आपली गोष्ट सगळ्यांना सांगू शकतील.

#BBCShe हा एक असा प्रोजेक्ट आहे ज्यातून वाचक आपली गोष्ट सगळ्यांना सांगू शकतील.

या प्रोजेक्टसाठी आम्ही वेगवेगळ्या शहरांमध्ये येणार आहोत आणि महिलांना त्यांना बीबीसीवर कुठल्या विषयांवर बातम्या वाचायला आवडतील, हे विचारणार आहोत.

अशी कोणती गोष्ट आहे जी आम्ही अजून सांगितली नाहीये. आणि अजूनही ती सांगायची राहिली आहे?

आम्हाला तुमच्या कल्पना ऐकायच्या आहेत - तुम्हाला काय प्रेरित करतं? काय सतावतं? कशातून तुम्हाला आनंद मिळतो? आम्हाला या सगळ्या गोष्टी तुमच्याकडून जाणून घ्यायच्या आहेत.

तुम्हाला काय प्रेरणा देतं? कशाचा त्रास होतो? काय पाहिलं की तुम्ही खुश होता? आम्हाला सांगा, आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल.

आम्ही बिहार, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गुजरात, पंजाब आणि महाराष्ट्रात येणार आहोत. तुम्हीही आमच्या सोबत हा प्रवास अनुभवू शकता आमच्या वेबसाईट, फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून.

तुमची कोणतीही कल्पना तुम्ही आमच्यासोबत #BBCShe वापरून ट्विटर वर शेअर करू शकता किंवा आम्हाला फेसबुकवर मेसेजही करू शकता.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)