पाहा व्हीडिओ : नॉर्वेमध्ये लोक 'चॉकलेटची तस्करी' का करत आहेत?

पाहा व्हीडिओ : नॉर्वेमध्ये लोक 'चॉकलेटची तस्करी' का करत आहेत?

नॉर्वेतील लोक चक्क चॉकलेटची तस्करी करत आहेत! नॉर्वेमध्ये लहान मुलांचं स्थूलतेचं प्रमाण वाढत असल्यामुळं सरकारने मिठाई आणि चॉकलेटवर 80 टक्के कर लादला आहे.

चॉकलेट आणि गोड पदार्थांच्या सेवनावर नियंत्रण असावं यासाठी हा कर आहे. पण नॉर्वेचे नागरिक स्वीडनमधून चॉकलेट खरेदीसाठी येणार हे लक्षात घेऊन स्वीडनच्या एका दुकानदारानं चाणाक्षपणे एक उद्योग केला.

नॉर्वे आणि स्वीडनच्या सीमेवर एका जणाने एक चॉकलेटचं दुकान उघडलं आहे. त्यामुळं हे दुकान खूप चालत आहे. नॉर्वेतील लोक इथं येतात आणि चॉकलेट विकत घेऊन आपल्या देशात नेतात.

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)