पाहा व्हीडिओ : 'मी होणार अमेरिकेचा पहिला मुस्लीम राष्ट्राध्यक्ष!'

पाहा व्हीडिओ : 'मी होणार अमेरिकेचा पहिला मुस्लीम राष्ट्राध्यक्ष!'

14 वर्षीय युसूफ दायूर हा सोमालियन-अमेरिकन नागरिक आहे. त्याला अमेरिकेचा पहिला मुस्लीम राष्ट्राध्यक्ष व्हायचंय. राष्ट्राध्यक्ष पदासाठीचं भविष्यातील नियोजनही त्याने करून ठेवलं आहे.

त्यासाठी भविष्यातील योजना आणि नियोजन त्याने केलेलं आहे. त्यावर भाष्य करणारा त्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

युसूफ त्याच्या कुटुंबासह मिनिसोटामध्ये राहतो. "मी आधी माझं शालेय शिक्षण पूर्ण करणार आहे. त्यानंतर कॉलेजमध्ये क्रिमिनॉलॉजी आणि कायद्याचं शिक्षण घेईल. त्यानंतर अध्यक्षपदासाठीच्या निवढणुकीची तयारी करेन," असं युसूफ सांगतो.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)