पाहा व्हीडिओ : मृत्यूच्या छायेतून पळ काढताना... सीरियात अजूनही 3.8 लाख लोक संघर्षग्रस्त!

पाहा व्हीडिओ : मृत्यूच्या छायेतून पळ काढताना... सीरियात अजूनही 3.8 लाख लोक संघर्षग्रस्त!

जवळजवळ 20,000 लोकांनी बंडखोरांच्या तावडीत असलेल्या पूर्व घूटा भागातून स्वतःचा जीव वाचवून पलायन केलं आहे. सीरियाची राजधानी दमस्कसजवळ हा परिसर आहे आणि गेल्या आठ वर्षांपासून हा भाग संघर्षग्रस्त आहे.

सीरियाच्या सरकारी सैन्याने या भागातून बंडखोरांना पळवून लावण्यासाठी हल्ले वाढवले आहेत. पण या हल्ल्यांमध्ये सामान्य नागरिकही भरडले जात आहेत.

अनेक बालकांसह इथले लोक हमोरियातून पळ काढत आहेत, जिथे गेल्या काही दिवसांत सतत बाँबस्फोट होत आहेत.

या प्रदेशातून बंडखोरांना पळवून लावण्यासाठी गेल्या महिन्यात सुरू झालेल्या सैन्य कारवाईत जवळजळ 1,100 हून अधिक लोकांचा बळी गेला असल्याचं माध्यमांमध्ये सांगण्यात येतं. आणि पूर्व घूटामध्ये साधारण 3.8 लाख लोकं अजूनही अन्न आणि वैद्यकीय मदतीची वाट पाहत आहेत.

तुम्ही हे वाचलं का?