पाहा व्हीडीओ - अलविदा सुडान : जगातला शेवटचा पांढरा नर गेंडा ज्याचं टिंडरवर अकाउंटही होतं!

पाहा व्हीडीओ - अलविदा सुडान : जगातला शेवटचा पांढरा नर गेंडा ज्याचं टिंडरवर अकाउंटही होतं!

केनियातला पांढरा गेंडा सुडान हा या उपप्रजातीतील शेवटचा नर गेंडा होता. 45 वर्षांच्या सुडानने सोमवारी केनियामधल्या ओल पेजेटा संवर्धन अरण्यात जगाचा निरोप घेतला.

त्याच्या मृत्युने गेंड्याची पांढरी उपप्रजातीच्या संवर्धनाचा प्रश्न अवघड झाला आहे.

सुडानच्या संवर्धनासाठी वन्यजीव कार्यकर्त्यांनी टिंडर या डेटिंग अॅपवर एक अकाउंट उघडण्यात आलं होतं.

पांढरे गेडे हे युगांडा, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, सुदान या देशात आढळायचे. पण 1970 आणि 1980च्या दशकात त्यांच्या बेसुमार शिकारीमुळे ही प्रजाती धोक्यात आली.

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)