पाहा व्हीडिओ : हा रोबो मासा पाहिलात का?

पाहा व्हीडिओ : हा रोबो मासा पाहिलात का?

SoFi - सॉफ्ट रोबो फिश म्हणजे रोबो मासा आहे. MIT CSAILनं तो बनवला आहे. 50फूट खोल पाण्यात जाऊन सागरी जीवनाचं निरीक्षण तो करू शकतो. याच्या शेपटीला मोटर बसवली आहे. कल्ले वापरून तो दिशाही बदलू शकतो.

खऱ्या माशासारखा तो पोहतो. डोळ्यातल्या लेन्सनं फोटोही घेतो. या सोफीमुळे बाकीच्या जलचरांना कुठलाही धोका वाटत नाही. हा आवाजसुद्धा करत नाही. त्यामुळे सागरी पर्यावरणावर किंचितही प्रभाव न टाकता तिथलं निरीक्षण अभ्यासकांना करता येऊ शकतं.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)