पाहा व्हीडिओ : #BBCShe : 'जिवे मारलं तरी चालेल, पण हे लग्न मान्य करणार नाही'

पाहा व्हीडिओ : #BBCShe : 'जिवे मारलं तरी चालेल, पण हे लग्न मान्य करणार नाही'

#BBCSheच्या माध्यमातून बीबीसीची टीम संपूर्ण देशाचा दौरा करत आहे. या दौऱ्यात बीबीसीची टीम महिलांना कोणते विषय महत्त्वाचे वाटतात हे जाणून घेणार आहे.

बिहारमधल्या पाटणा शहरात बीबीसीची टीम पोहोचली तेव्हा तिथल्या तरुणींची मतं आमच्या टीमनं जाणून घेतली. यात बळजबरीनं केल्या जाणाऱ्या विवाहाबद्दल अनेक तरुणींनी त्यांची मतं मांडली.

बिहारमध्ये 'पकडौआ शादी' म्हणजे बळजबरीनं विवाह लावण्याचे प्रकार घडतात. मुलीचे कुटुंबीय तरुणाला पळवून नेतात आणि बळजबरीनं त्यांच्या मुलीशी लग्न लावतात. या घटनांचा आढावा बीबीसीच्या टीमनं घेतला आहे.

दिव्या आर्य यांचा रिपोर्ट.

प्रोड्यूसर - विकास पांडे, सिटू तिवारी

शूट-एडिट - कासिफ सिद्दिकी

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)