पाहा व्हीडिओ - रशिया : चिमुकली मुलं खेळत होती तिथेच लागली आग
पाहा व्हीडिओ - रशिया : चिमुकली मुलं खेळत होती तिथेच लागली आग
रशियाच्या सायबेरियामधल्या केमेरोफो शहरात एका शॉपिंग सेंटरमध्ये भीषण आग लागली आहे. चौथ्या मजल्यावर लहान मुलं खेळत होती आणि त्याच ठिकाणी आग लागली. या आगीत आतापर्यंत 64 लोकांना जीव गमवावा लागला आहे.
केमेरोफोच्या आपत्कालीन विभागाचे अधिकारी येवगिनी देद्युखीन यांनी दिलेल्या माहितीनुसार, "सायंकाळी 4.10 वाजता मॉलच्या चौथ्या मजल्यावर आग लागल्याचं समजलं. मुलांच्या खेळण्याची आणि सिनेमा हॉलची ती जागा होती."
2013मध्ये सुरू झालेलं हे शॉपिंग सेंटर अतिशय लोकप्रिय असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. तिथं एक छोटंसं प्राणीसंग्रहालयसुद्धा आहे.
केमेरोफो शहर रशियाची राजधानी मॉस्कोपासून 3540 किमी अंतरावर आहे. कोळसा उत्पादनासाठी हे शहर ओळखलं जातं.
हे पाहिलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)