पाहा व्हीडिओ : #BBCShe : 'वयात आलेल्या मुलीला पूजता मग त्यांना अस्पृश्य का मानता?'

पाहा व्हीडिओ : #BBCShe : 'वयात आलेल्या मुलीला पूजता मग त्यांना अस्पृश्य का मानता?'

आंध्रप्रदेशातल्या विशाखापट्टणम शहरात बीबीसीची टीम पोहोचली तेव्हा तिथल्या तरुणींची मतं आमच्या टीमनं जाणून घेतली. वयात येणाऱ्या मुलींना कोणत्या समस्येला तोंड द्यावं लागतं याविषयी चर्चा केली. त्यावेळी पाळीविषयीचे गैरसमज मुलींनी सांगितले आणि लैंगिक शिक्षणाच्या अभावाविषयीही चर्चा झाली.

#BBCSheच्या माध्यमातून बीबीसीची टीम संपूर्ण देशाचा दौरा करत आहे. या दौऱ्यात बीबीसीची टीम महिलांना कोणते विषय महत्त्वाचे वाटतात हे जाणून घेणार आहे.

एकीकडे मुलगी वयात आली की तिला पूजलं जातं. पाळी आली की तिला अस्पृश्य मानता तर तिचीच पूजा का करता? असं आंध्रा युनिव्हर्सिटीतील एका विद्यार्थीने प्रश्न उठवला.

"शालेय अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षणाचे पाठ आहेत. पण ग्रामीण भागातील सरकारी शाळेतील शिक्षक ते शिकवण्याचं टाळतात. कारण, मुलं लाजून पळून जातात," असं एका शिक्षिकेनं बीबीसीशी बोलताना सांगितलं.

दिव्या आर्य यांचा रिपोर्ट.शूट-एडिट - कासिफ सिद्दिकी

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)