पाहा व्हीडिओ : लोंगवा : एक गाव दोन देश

नागालॅंडच्या लोंगवा गावातल्या या एकमेव महालाच्या अंगणात दोन देश आहेत. भारत आणि म्यानमार.

कधी इथे राज्य करणाऱ्या आदिवासी कोन्याक नागा संस्थानाचा हा राजमहाल होता. आजही हे राजघराणं दोन देशांच्या सीमेने 'दुभंगलेल्या' महालात राहतं.

"भारत आणि म्यानमार या दोन देशांनी सीमारेषा उभारून लोकांना वेगवेगळं केलं. पण आम्ही मात्र आमच्या पूर्वजांच्या या संस्थानामध्येच राहतो आहोत. सीमारेषेबद्दल आम्हाला काहीही हरकत नाही," असं अमोऊ तैवांग राजा सांगतात.

रिपोर्टर- मयुरेश कोण्णूर,

शूट आणि एडिट - शरद बढे,

प्रोड्युसर - शालू यादव

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)