पाहा व्हीडिओ : ग्रामीण जनतेचं आरोग्य 10 लाख भोंदू डॉक्टरांच्या हातात?

कोणतंही वैद्यकीय प्रशिक्षण नसताना भारतात तब्बल 10 लाखांपेक्षा जास्त भोंदू डॉक्टर ग्रामीण भागातील लोकांवर उपचार करत आहेत. आरोग्यसेवा पोहोचलेल्या नसल्याने अशा ग्रामीण भागात सर्रास भोंदू डॉक्टर आढळतात.

"आम्ही लोकांचा जीव धोक्यात घालतो असं काहींना वाटत. पण आम्ही प्राथमिक उपचार करून रुग्णांना आणि सरकारला मदत करतो," असं उत्तर प्रदेशमधल्या झोला छाप प्रेम त्रिपाठी यांच म्हणण आहे. त्यांनी झोला छाप लोकांची म्हणजे भोंदू डॉक्टरांची संघटना स्थापन केली आहे. वैद्यकीय प्रशिक्षण देऊन आम्हाला अधिकृत मान्यता द्यावी अशी त्यांची मागणी आहे.

इंडियन मेडिकल असोशिएशनच्या आकडेवारीनुसार देशात वैद्यकीय सेवा देणाऱ्यांपैकी कोणतही औपचारिक प्रशिक्षण न घेतलेल्यांची संख्या 45 टक्के इतकी आहे.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)