#BBCShe : पहिली मासिक पाळी साजरी करण्यासाठी जिथं लाखोंचं कर्ज काढलं जातं

#BBCShe : पहिली मासिक पाळी साजरी करण्यासाठी जिथं लाखोंचं कर्ज काढलं जातं

'बीबीसी शी पॉप अप' या उपक्रमाअंतर्गत आंध्र प्रदेश विद्यापीठातल्या विद्यार्थिनींनी मासिक पाळी आल्यावर त्यांच्या आयुष्यावर काय परिणाम झाला ते सांगितलं.

जेव्हा मुलींना पहिल्यांदा पाळी येते तेव्हा तिला घरात वेगळं बसवलं जातं. तिच्यासाठी भांडी वेगळी ठेवली जातात आणि तिला वेगळं प्रसाधनगृह वापरायला सांगितलं जातं.

पुढचे पाच ते अकरा दिवस तिला अंघोळ करायची परवानगी नसते. नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत एक कार्यक्रम केला जातो.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)