तुम्ही अनोळखी लोकांना रात्री घरात आश्रय देणार का?

तुम्ही अनोळखी लोकांना रात्री घरात आश्रय देणार का?

आपल्या मायदेशातल्या संघर्षातून पळ काढत UKकडे निघालेल्या स्थलांतरितांना बेल्जियममधील रहिवासी आपल्या घरी रात्रीचा निवारा देत आहेत.

ब्रसेल्सच्या एका पार्कमध्ये रोज रात्री हे स्थलांतरित एकत्र येतात. अनेकांना बेल्जियममध्ये आश्रय नकोय. त्यांना UKला जायचंय.

गेली चार महिने ब्रसेल्समध्ये इझाबेल स्थलांतरितांना आश्रय देत आहेत. त्यांच्यासारख्या स्वयंसेवकांमुळे जवळपास 500 लोकांना रोज रात्री आश्रय मिळतो.

आणि गेल्या सहा महिन्यांत 4,000 कुटुंबं या स्थलांतरितांच्या मदतीला आले आहेत . फेसबुकवर 34,000 हून अधिक लोक या मोहिमेशी जोडले गेलेत.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)