थायलंड : रेल्वे ट्रॅकच्या इंचभर दूरवर असलेली बाजारपेठ!
थायलंडमधील मेक्लाँग रेल्वे मार्केटमध्ये आपलं स्वागत. थायलंडच्या नागरिकांसाठी हे सर्वसामान्य मार्केट असलं तरी जगभरातील पर्यटकांसाठी ते जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. का बरं असं?
कारण हे मार्केट एकदम रुळापासून काही इंचांवर भरतं. खरंच!
मेक्लाँग रेल्वे मार्केट शतकाहून अधिक काळ जुनं आहे. मासेमारीसाठी प्रसिद्ध या गावी दूरवरच्या ग्राहकांना येता यावं म्हणून ही रेल्वे सुरू झाली. नंतर लोकांनी त्याशेजारीच मार्केट केलं. आणि आता हे मार्केट रेल्वे ट्रॅकच्या इतक्याजवळ वसलेलं आहे की, रेल्वे इथून अगदी काही इंचांवरून जाते.
रेल्वे आली की व्यापारी ट्रॅकवरच्या छत्र्या आणि कापडी छत गुंडाळतात. रेल्वे गेल्यानंतर मार्केट पूर्ववत होतं. व्यापाऱ्यांसाठी तर हे रोजचंच, पण पर्यटकांसाठी तर हा एक भन्नाट अनुभव!
तुम्ही हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)