पाहा व्हीडिओ : 'I have a dream' भाषणाने अमेरिका गाजवणारे मार्टिन ल्युथर किंग!

पाहा व्हीडिओ : 'I have a dream' भाषणाने अमेरिका गाजवणारे मार्टिन ल्युथर किंग!

मार्टिन ल्युथर किंग ज्यु. यांची बरोबर 50 वर्षांपूर्वी - 4 एप्रिल 1968 रोजी हत्या झाली. मार्टिन ल्युथर किंग यांची गणना जगातील सर्वांत प्रभावशाली नेत्यांमध्ये होते. नागरी हक्क चळवळीत त्यांनी दिलेलं योगदान फार मोठं आहे.

बरोबर 50 वर्षांपूर्वी 4 एप्रिल रोजी त्यांची हत्या करण्यात आली. तुम्ही कदाचित या अमेरिकन नेत्याचं 'I have a dream' भाषण ऐकलं असेल. 1929 मध्ये जॉर्जिया राज्यातील एका प्रतिष्ठित कुटुंबात किंग यांचा जन्म झाला.

लहानपणीच त्यांना गोऱ्यांकडून भेदभावाला सामोरं जावं लागलं. त्यांच्याबरोबर खेळायला गेलं की, ते मला टाळायचे, असं किंग म्हणायचे.

रोझा पार्क या आफ्रिकन-अमेरिकन महिलेनं बसमध्ये एका गोऱ्यासाठी जागा रिकामी करण्यास नकार दिला. त्यासाठी तिला अटक करण्यात आली. मग 381 दिवस बस बहिष्कार आंदोलन झालं. किंग त्याचे नेते होते.

वंशभेदविरोधी लढ्यासाठी त्यांना 1964 साली शांततेचं नोबेल मिळालं. 968ला टेनेसीमध्ये एका आंदोलनात किंग यांची हत्या करण्यात आली. त्यांचा खुनी जेम्स एर्ल रे हा कृष्णवर्णीयांचा द्वेष करायचा.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)