पाहा व्हीडिओ : नदीतला कचरा साफ करणारा ट्रॅश रोबो पाहिलात का?

पाहा व्हीडिओ : नदीतला कचरा साफ करणारा ट्रॅश रोबो पाहिलात का?

'अर्बन रिव्हर्स'नं शिकागोतल्या नद्या सफाईसाठी ट्रॅश रोबो तयार केलाय. इंटरनेटशी कनेक्ट असल्यामुळे कुठूनही तो कंट्रोल करता येतो. भविष्यात कुठेही बसून कुठल्याही नदीतला कचरा साफ करता येईल. याचा रोबो गेमसुद्धा होण्याची शक्यता आहे.

नदीतल्या कचऱ्यामध्ये स्टीरोफोमपासून रबरापर्यंत असं काहीही असू शकतं. कॅमेऱ्याच्या मदतीनं अशा वस्तू आजूबाजूला तुम्हाला दिसतात.

हा प्रयोग इतरही शहरांत राबवण्यासाठी अर्बन रिव्हर्स तयारी करत आहे.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)