पाहा व्हीडिओ - #आंबेडकरआणिमी : 'स्वत:च्या घरापासूनच बाबासाहेबांच्या विचारांची सुरूवात करा'

पाहा व्हीडिओ - #आंबेडकरआणिमी : 'स्वत:च्या घरापासूनच बाबासाहेबांच्या विचारांची सुरूवात करा'

दुर्गा गुडिलु या महाराष्ट्रातल्या जातपंचायतीविरोधातल्या लढ्याच्या चेहरा बनल्या आहेत. भटक्या वैदू समाजातल्या बालविवाह आणि जातपंचायत सारख्या प्रथा या तरुणीने मोडून काढल्या आहेत.

जंगलात जाऊन वनौषधी गोळा करणं आणि गावोगाव फिरून ती औषधं म्हणून विकणं हा या वैदू समाजाचा पारंपारिक व्यवसाय. पण काळ बदलत गेला, औषधांचं विज्ञान बदललं, पण भटका वैदू समाज शिक्षणापासून लांब राहिल्यानं जुन्याच कामात अडकून राहिला आहे.

शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थितीत जुन्या रूढी परंपरा, अंधश्रद्धा समाजावर आपला प्रभाव बळकट करतात, जात पंचायती आपला वचक बळकट करतात. आणि जेव्हा दुर्गा सारख्या स्वातंत्र्याची जाणीव झालेल्या व्यक्तीच्या त्या आड येतात, तेव्हा लढा अटळ असतो. आज दुर्गा गुडिलु या महाराष्ट्रातल्या जातपंचायतीविरोधातल्या लढ्याच्या चेहरा बनल्या आहेत.

त्या राज्यभर फिरतात आणि ज्या ज्या भागात वैदू समाजातले लोक आहेत तिथपर्यंत हे काम पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. दुर्गा गुडिलुंचं संस्थात्मक कार्य आता आकार घेऊ लागलं आहे.

पण हा सगळा संघर्ष करण्याची आणि पुढे जाण्याची प्रेरणा कोण आहे? दुर्गा यांचं उत्तर असतं की त्यांची प्रेरणा डॉ बाबासाहेब आंबेडकर आहेत.

शूट/एडिट - शरद बढे, बीबीसी प्रतिनिधी

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)