पाहा व्हीडिओ - पार्किनसन्स दिनविशेष : डान्स थेरेपीने कसा होतो कंपवातावर उपचार?

पाहा व्हीडिओ - पार्किनसन्स दिनविशेष : डान्स थेरेपीने कसा होतो कंपवातावर उपचार?

पार्किनसन्स म्हणजेच कंपवात. मेंदूच्या पेशींचा ऱ्हास आणि मेंदूतील डोपामाईन केमिकलची मात्रा कमी झाल्याने होणारा हा एक आजार आहे.

यामुळे त्या व्यक्तीच्या हालचाली, बोलणं, स्मृतीवर परिणाम दिसून येतो.

या आजाराचा शोध इंग्लिश शल्यचिकित्सक जेम्स पार्किनसन्स यांनी लावला. 11 एप्रिल हा त्यांचा जन्मदिन. दरवर्षी 'जागतिक पार्किनसन्स दिन' म्हणून साजरा केला जातो.

डोपामाईन केमिकल्सचं प्रमाण पन्नास टक्क्याहून कमी झाल्यास पार्किनसन्स होण्याची शक्यता असते. मात्र डोपामाईन का कमी होतं, याचं अद्याप ठोस कारण सापडू शकलेलं नाही. त्यामुळे हा प्रोग्रेसिव्ह आजारांमध्ये गणला जातो.

हातापायांमध्ये कंपन, चालण्याची गती कमी होणं, तोल जाणं, शरीर वाकणं, चेहरा मास्कसारखा स्थिर होणं, बोलायला त्रास होणं ही पार्किंनसन्सची लक्षणं आहेत.

या आजाराच्या शारीरिक आणि मानसिक संतुलन राखण्यात डान्स आणि मूव्हमेंट थेरेपी कशी काम महत्त्वाची ठरते, हे जाणून घेण्यासाठी पाहा व्हीडिओ.

शूटिंग - प्रशांत ननावरे

एडिटिंग - गणेश पोळ

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)