पहिल्या महायुद्धापासून सीरियापर्यंत : रासायनिक शस्त्रांची 100 वर्षं

पहिल्या महायुद्धापासून सीरियापर्यंत : रासायनिक शस्त्रांची 100 वर्षं

पहिल्या महायुद्धापासून ते आजपर्यंत, 'क्लोरीन' ते 'नोव्हिचॉक'पर्यंत रासायनिक शस्त्रांचा शंभर वर्षांचा इतिहास आहे. रासायनिक शस्त्रास्त्रं सल्लागार हामीश दे ब्रेटन गॉर्डन यांच्याकडून आम्ही या शंभर वर्षांतील रासायनिक शस्त्रांबद्दल जाणून घेतलं.

सर्वप्रथम वापरलं गेलेलं रासायनिक शस्त्र होतं गुदमरवणारं क्लोरीन. जीव घेण्यापेक्षा लोकांना जायबंदी करणारं रसायन होतं ते. पण त्याने अनेक बळीही घेतले.

त्यानंतर लगेच आलं ते मस्टर्ड एजंट, अर्थात मस्टर्ड गॅस. त्यानंतर काही काळाने नाझींनी नर्व्ह एजंट तयार केले. हे थेट तुमच्या मज्जासंस्थेवर आघात करतात.

1984 ते 1988 दरम्यान इराण-इराक युद्धात नर्व्ह एजंटचा खूप वापर झाला. आणखी यात काय मोठे बदल झाले?

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)