#आंबेडकरआणिमी : 'बाबासाहेबांमुळे आम्हाला व्यक्ती म्हणून मान्यता मिळाली!' - दिशा शेख

#आंबेडकरआणिमी : 'बाबासाहेबांमुळे आम्हाला व्यक्ती म्हणून मान्यता मिळाली!' - दिशा शेख

"पारंपरिक जगणं सोडा, पारंपरिक वाट सोडा आणि एक नवीन परिवर्तन घडवूयात असे शब्द जिथे जिथे येतात तिथे तिथे बाबासाहेब आहेत." हे शब्द आहेत तृतीयपंथी कवयित्री दिशा पिंकी शेख यांचे.

'जयभीम सगळ्यांना मी दिशा पिंकी शेख.' अशा शब्दात दिशा यांनी आमच्याशी बोलण्याला सुरुवात केली. दिशा यांच्यात कमालीचा आत्मविश्वास दिसतो.

तृतीयपंथी समाजातील समस्या त्या अत्यंत प्रभावीपणे आपल्या कवितांमधून सोशल मीडियावर मांडत असतात या त्यांच्या कवितांना वाचक भरभरून प्रतिसादही देतात.

त्यांच्या कवितांमधून तृतीयपंथी समाजातील जीवन, त्यांच्या भावभावना, त्यांचा जगण्याकडे बघण्याची दृष्टिकोन या सर्वांचं यथार्थ चित्रण आपल्याला दिसतं. या सर्वाचं श्रेय त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना देतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)