BBC Exclusive पाहा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची स्फोटक मुलाखत

BBC Exclusive पाहा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची स्फोटक मुलाखत

1953 सालच्या जून महिन्यामध्ये बीबीसीला दिलेल्या स्फोटक मुलाखतीत बाबासाहेबांनी 'भारतात संसदीय लोकशाही काम करणार नाही', असं वक्तव्य केलं होतं.

'India's Challenge: Will The Democratic Experiment Succeed?' या विशेष मालिकेत बीबीसीने भारताच्या या नवजात लोकशाहीचा आढावा घेतला होता. यात डॉ. आंबेडकरांशीही बातचीत करण्यात आली.

भारतीय लोकशाहीचा आत्मा असणारी घटना लिहिण्यात आंबेडकरांचा मोठा वाटा होताच, शिवाय ते नेहरूंच्या हंगामी सरकारमध्ये कायदा मंत्रीही होते.

1951 साली त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देत नेहरू सरकारवर उपेक्षित समाजांसाठी पुरेसे प्रयत्न न केल्याचा आरोप केला होता.

बाबासाहेब नेमकं काय म्हणाले होते, ते पाहा या व्हीडिओमध्ये -

तुम्ही हे वाचलंत का?

ही क्विझ नक्की घेऊन पाहा

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)