पाहा व्हीडिओ - हे आहेत जगातले सर्वांत लोकप्रिय लोक

पाहा व्हीडिओ - हे आहेत जगातले सर्वांत लोकप्रिय लोक

जगातल्या सर्वांत लोकप्रिय 20 लोकांची यादी YouGov या कंपनीनं जाहीर केली आहे. त्यांच्या एका सर्वेक्षणानुसार अॅंजलिना जोली आणि बिल गेट्स जगातले सर्वांत लोकप्रिय लोक आहेत, तर ओबामा दांपत्य दुसऱ्या नंबरवर.

जॅकी चॅन आणि ऑफ्रा विन्फ्रे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. राणी एलिझाबेथ आणि शी जिनपिंग हे राष्ट्रप्रमुख चौथ्या नंबरवर आहेत.

महिलांच्या यादीत मनोरंजनाच्या क्षेत्रातल्या 14 जणी आहेत. त्यात अभिनेत्री, गायिका, टीव्ही प्रेझेंटर्सचा समावेश आहे. तर पुरुषांच्या यादीत अनेक राजकारणी किंवा राष्ट्रप्रमुख आहेत.

इतर क्षेत्रांपेक्षा मनोरंजनातल्या महिलांना जास्त पसंती आहे. शोबिझमधल्या महिला प्रशंसनीय आहेत की राजकारण आणि उद्योग जगातल्या? की या क्षेत्रांमध्ये पुरेसं महिला नेतृत्वच नाही, हे वास्तव आहे?

तुम्हाला काय वाटतं?

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)