पाहा व्हीडिओ: इस्तंबूलमध्ये आंदोलन - मशिदींमध्ये पुरुषांनी पुढे, महिलांनी मागे का बसावं?

पाहा व्हीडिओ: इस्तंबूलमध्ये आंदोलन - मशिदींमध्ये पुरुषांनी पुढे, महिलांनी मागे का बसावं?

तुर्कस्तानातल्या इस्तंबूलमध्ये 'Women in Mosques' ही मोहीम सुरू झाली आहे. या महिलांनी मशिदीतल्या वेगळ्या जागेच्या विरोधात आवाज दिला आहे.

महिलांना नमाजासाठी वरच्या गॅलरीत किंवा सगळ्यांत मागे जागा असते.

हा नियम मोडणाऱ्या एका महिलेला मार्चमध्ये मशिदीबाहेर काढलं. त्या घटनेनंतर 'Women in Mosques' ही मोहीम सुरू झाली.

त्याच मशिदीत मुख्य दालनात जाऊन सुमारे 40 महिलांनी प्रार्थना केली. पाहा त्यांच्या लढ्याची ही कथा.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)