पाहा व्हीडिओ - कॉमनवेल्थ गेम्समधून 13 खेळाडू कुठे गायब झाले?

पाहा व्हीडिओ - कॉमनवेल्थ गेम्समधून 13 खेळाडू कुठे गायब झाले?

ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये भरलेल्या कॉमनवेल्थ गेम्सचं नुकतंच सूप वाजलं. यानंतर काही देशांचे काही खेळाडू आपापल्या मायदेशी परतण्याऐवजी ऑस्ट्रेलियातच गायब झाले आहेत.

यावेळी तब्बल 13 खेळाडूंचा पत्ता लागत नाही आहे. यातले बहुतांश खेळाडू आफ्रिकेतल्या कॅमेरून देशातले आहेत. पण हे काही नवीन नाही.

आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून खेळाडूंचं असं गायब होणं या आधीही घडलंय. हे खेळाडू उज्ज्वल भविष्यासाठी गायब होतात, असं सांगितलं जातं.

2011 मध्ये तर आणखीनच चकित करणारी एक घटना घडली होती. सेनेगल देशाची संपूर्ण फुटबॉल टीमच फ्रान्समधून नाहीशी झाली होती. असं का होतं?

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)