लिहिता वाचता येत नव्हतं, मग कॅमेरा उचलला...
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : लिहिता वाचता येत नव्हतं, मग कॅमेरा उचलला...

या आहेत माया. शालेय शिक्षण न झालेल्या एका कॅमेऱ्याच्या सहाय्याने माया समाजातले प्रश्नं गेली अनेक वर्षं मांडत आहेत.

नाशिकमधल्या एका स्वयंसेवी संस्थेच्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर त्यांना कॅमेऱ्याची ताकद कळली.

"लिहिता वाचता येत नव्हतं, मग आपले प्रश्न जगापुढे मांडायला कॅमेरा हे उत्तम माध्यम वाटलं," असं त्या म्हणतात.

"आपल्या प्रश्नांसाठी आता आरडा-ओरडा नाही करावा लागत. कॅमेऱ्यानं शूट करायचं आणि सत्य अधिकाऱ्यांपुढे मांडायचं. शंभरातल्या नव्वद वेळेस उपाय सापडतोच. तोही आवाज न वाढवता."

पण इथपर्यंत पोहचण्याचा त्यांचा प्रवास कसा होता? त्यांच्या कचरा वेचणाऱ्या हातांनी जेव्हा कॅमेरा हातात घेतला तेव्हा लोकांची प्रतिक्रिया काय होती ?

मुख्य म्हणजे आता त्यांच्या आसपासची परिस्थिती बदलली आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी हा व्हीडिओ नक्की पाहा.

रिपोर्टर - अनघा पाठक

कॅमेरा - प्रवीण ठाकरे

एडिट - परवेज अहमद, परवाज लो

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)