प्लास्टिक खाऊन नष्ट करता येईल का?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : प्लास्टिक खाणारं एन्झाइम सापडलं

आतापर्यंत प्लास्टिकचा पुनर्वापर करून त्यापासून बाटल्या तयार केल्या जातात ते तुम्ही पाहिलं असेल. पण प्लास्टिक खाऊन ते नष्ट करणाऱ्या एन्झाइमबद्दल तुम्ही ऐकलं आहे का?

UKच्या युनिव्हर्सिटी ऑफ पोर्ट्समथ येथिल वैज्ञानिकांनी अशा एन्झाइमचा शोध लावला आहे. हे एन्झाइम चक्क प्लास्टिक खातात. प्लास्टिक नष्ट करण्याचा हा सगळ्यात चांगला पर्याय मानला जात आहे. पण या तंत्राद्वारे सगळ्याच प्रकारचे प्लास्टिक नष्ट करता येणार नाही. म्हणून प्लास्टिकचा कमीत कमी वापर करावा असं काहींचं म्हणणं आहे.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)