शांबरिक खरोलिकाः दादासाहेब फाळकेंच्या चित्रपटाआधी चालायचे यांचे शो
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

शांबरिक खरोलिका : दादासाहेब फाळकेंच्या आधीच्या काळात भारतात असा होता सिनेमा

भारतात दादासाहेब फाळकेंचा चित्रपट येण्याआधीच चित्रपटांसारखे खेळ व्हायचे, असं सांगितलं तर?

तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण चित्रपटांचा काळ सुरू होण्याच्या 125 वर्षांपूर्वी चित्रपटांप्रमाणेच 'शांबरिक खरोलिका'चे खेळ देशभर चालायचे, असा दावा ठाण्याच्या पटवर्धन कुटुंबीयांनी केला आहे.

विशेष म्हणजे या खेळात वापरण्यात येणाऱ्या संपूर्ण तंत्रज्ञानाचं आजच्या चित्रपटांशी खूप साधर्म्य आहे.

'शांबरिक खरोलिका' हा प्रकार भारतात पहिल्यांदा आणला तो ठाण्यात राहणाऱ्या महादेव पटवर्धन यांनी. याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी आम्ही महादेव पटवर्धन यांचे पणतू सुनील पटवर्धन यांची भेट घेतली. त्यांनी शांबरिक खरोलिकाच्या इतिहासाविषयी तसंच त्याच्या खेळांबद्दल बीबीसी मराठीला माहिती दिली.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)