पाहा व्हीडिओ - आणि त्याने चक्क गाढवांच्या पाठीवरच फिरतं वाचनालय सुरू केलं!

पाहा व्हीडिओ - आणि त्याने चक्क गाढवांच्या पाठीवरच फिरतं वाचनालय सुरू केलं!

कोलंबियातल्या ग्रामीण भागातल्या मुलांना गृहपाठासाठी पुस्तकं मिळत नाहीत. या विचाराने चिंताग्रस्त झालेल्या लुईस सोरियानो यांनी चक्क गाढवाच्या पाठीवरच एक फिरतं वाचनालय सुरू केलं.

अल्फा आणि बेटो या दोन गाढवांच्या पाठीवर आपल्याकडील पुस्तकं लादून ते गावोगावी फिरतात. गावातल्या मुलांपर्यंत पुस्तकं पोहोचवतात.

सोरियानो यांच्या मते पुस्तक हातात पडल्यावर मुलांच्या मनाची कवाडं उघडतात आणि त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळतो.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)