बिहारमधला बिनबायकांचा तमाशा पाहिलात का?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : लयास चाललेल्या 'लौंडा नाच'ला जिवंत ठेवण्यासाठी तरुणाची धडपड

दिल्लीत यंदा पहिल्यांदाच थिएटर ऑलिम्पिक फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. यात जगभरातल्या जवळपास 30 देशांतल्या 25,000 कलाकारांनी सहभाग नोंदवला.

समारोप सोहळ्यात राकेश कुमार यांच्या लौंडा नाच परफॉरर्मन्सनं सर्वांची मनं जिंकली.

बिहारच्या ग्रामीण भागात लौंडा नाच खूप लोकप्रिय आहे. यात स्त्रियांचा वेष परिधान करून पुरुष नृत्य करतात.

"ढोल आणि हार्मोनियम वाजवून, झाल वाजवून जेव्हा पुरुष उड्या मारत नृत्य करतो तेव्हा त्यात वेगळीच मजा असते," लौंडा नाचबद्दल राकेश सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)