या गावात रोबोट पाणी आणतात म्हणे
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ - मराठी माणसाने बनवला गावाकडे पाणी भरून आणणारा हा रोबो!

आजही भारतात अनेक गावांमध्ये, छोट्या शहरांमध्ये स्त्रियांना दूरवरच्या तळ्यावरून किंवा विहिरीतून पाणी भरून आणावं लागतं. याचं समाधान शोधलंय अमेरिकेतल्या एका मराठी माणसानं!

युनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगोच्या डॉ. अमोल देशमुख यांनी 'हस्की' नावाचा एक रोबो तयार केलाय जो लोकांच्या घरी जाऊन पाणी पुरवतो. अमृता विद्यापीठाच्या अक्षय नागराजन यांच्यासोबत त्यांनी हस्कीला विकसित केलं आहे.

गंमत म्हणजे हा रोबोट पुरुषाच्या आवाजात लोकांना हाका मारून पाणी पोहोचवतो. पण गावकरी त्याला बाईच समजतात. कारण गावांमध्ये वर्षानुवर्षं महिलाच पाणी आणत आल्या आहेत. म्हणून त्यांना याचं थोडं आश्चर्यही वाटतं.

सध्या हा केवळ एक प्रयोग आहे, जो गावाकडे यशस्वी झाल्यास तो इतरत्र राबवता येईल.

रोबोला गावकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)