'मुख्यमंत्री खोटं बोलतात, मी स्वतः संडासला बाहेर जाते'
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : 'मी स्वतः संडासला बाहेर जाते, महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाला कसं काय म्हणणार?'

"मी स्वतः संडासला बाहेर जाते. त्यामुळे गाव हागणदारीमुक्त झालं असं मी कसं म्हणू शकते? याचा अर्थ मुख्यमंत्री खोटं बोलत आहेत," हे शब्द उघड्यावर संडासला जाणाऱ्या सत्यभामा सेलकर यांचे आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा 18 एप्रिलला केली होती.

या घोषणेत किती तथ्य आहे हे जाणून घेण्याकरता आम्ही बुलडाणा जिल्ह्यातल्या (चिखली तालुका) डोंगरशेवली गावात 23 आणि 24 एप्रिल असे दोन दिवस वास्तव्य केलं. गावातल्या 169 कुटुंबाकडे आजही शौचालय नाही, तसंच गावात सार्वजनिक शौचालयही नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)