बुडालेल्या गावावर उभारला जगातला सर्वात मोठा सौर प्रकल्प
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : बुडालेल्या गावावर उभारला जगातला सर्वात मोठा सौर प्रकल्प

चीनमधल्या एका गावाखाली कोळशाची खाण होती. ती कोसळली आणि अख्खं गाव पाण्यात बुडालं. आता त्याच जागेवर जगातला सर्वात मोठा तरंगता सौर प्रकल्प उभारला गेला आहे.

जवळजवळ 15 हजार घरांना वीज पुरवण्याची या प्रकल्पाची क्षमता आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, चीनमध्ये वायू प्रदूषणामुळे जवळपास 10 लाख लोक दरवर्षी दगावतात.

अशा सौर प्रकल्पांमुळे केवळ प्रदूषण थांबेल, एवढंच नाही, तर जीवितहानीही कमी होऊ शकते.

बीबीसीच्या या मालिकेसाठी स्कोल फाउंडेशननं मदत केली आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)