हे मुंबईकर अरबी समुद्रात राहतात...
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : हे मुंबईकर राहतात अरबी समुद्रात

मुंबईच्या वाढत्या शहरीकरणात इथली मत्स्यसंपदा अजूनही तग धरून आहे. मुंबईतल्या वर्सोव्यात ऑलिव्ह रिडले कासवांचा जन्म झाल्यावर इथल्या सागरी संपदेची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

आजही मुंबईच्या सागरी किनाऱ्यांवर ऑक्टोपस, समुद्री गोगलगायी, प्रवाळ, खेकडे, कोळंबी, जेली फिश, स्टींग रे, स्टार फिश यांसारखे मासे आढळतात. इतकंच काय तर डॉल्फिन मासेही मुंबईच्या किनाऱ्यांवर दर्शन देऊन जातात. मात्र, सध्या सांडपाणी आणि प्लास्टिकच्या प्रदूषणामुळे या मत्स्यसंपदेच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाल्याचं मत पर्यावरणवादी व्यक्त करतात.

रिपोर्टर - संकेत सबनीस

शूटिं - प्रशांत ननावरे

एडिटिंग - परवेझ खान

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)