पाहा व्हीडिओ - कर्मवीर भाऊराव पाटलांनी लावलेल्या रोपट्याचा आता वटवृक्ष झालाय

रयत शिक्षण संस्था स्थापन करण्याच्या उद्देशानं कर्मवीरांनी 1933 साली महात्मा गांधीची भेट घेतली. त्यावेळी गांधींनी 500 रुपयांची पहिली देणगी दिली होती.

साबरमतीच्या आश्रमात जे मी करू शकलो नाही ते भाऊराव तुम्ही साताऱ्यात करून दाखवलं, असं गाधींनी भाऊरावांना पाठवलेल्या पत्रात लिहिलं होतं.

गरीब आणि होतकरू मुलांच्या शिक्षणासाठी कर्मवीरांनी 'कमवा आणि शिका' ही योजना सुरू केली होती.

कर्मवीरांची आज पुण्यतिथी आहे. 9 मे 1959 रोजी त्यांचं निधन झालं.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)