पाहा व्हीडिओ : शाही विवाह सोहळ्यातले नेमके वेगळे क्षण

पाहा व्हीडिओ : शाही विवाह सोहळ्यातले नेमके वेगळे क्षण

लग्नानंतर नवऱ्याच्या सगळ्या आज्ञा पाळेन अशी शपथ न घेता मेगन आता शाही घराण्याचा सूनबाई झाल्या आहेत.

शाही लग्नात मेगन यांच्या माहेरकडून फक्त त्यांची आई डॉरिस रॅगलँड लग्नाला आल्या होत्या. त्या आफ्रिकन अमेरिकन आहेत.

मेगन यांचे वडील उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे अर्ध्या वाटेत पोहोचल्यावर मेगनचे सासरे प्रिन्स चार्ल्स यांनीच त्यांना बोहल्यापर्यंत साथ दिली.

मेगन यांनी परिधान केलेला लग्नाचा पोषाख हा ब्रिटीश डिझायनर क्लेअर वाईट केलर यांनी तयार केलेला होता.

गेल्या वर्षीच क्लेअर यांची गिवेन्ची या प्रसिद्ध फ्रेंच फॅशन ब्रँडच्या कलात्मक संचालकपदी नेमणूक झाली. हा मान मिळवणाऱ्या त्या पहिल्याच महिला आहेत.

या विवाहानंतर या शाही जोडप्याला ड्युक आणि डचेस ऑफ ससेक्स म्हणून ओळखलं जाईल.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)