'मी १४ वर्षांचा असताना त्या धर्मगुरूने माझ्यावर बलात्कार केला'

“ती एक काळी रात्र होती. मी तेव्हा फक्त १४ वर्षांचा होतो. ते माझ्या जवळ आले आणि कोणतंही प्रोटेक्शन न वापरता त्यांनी माझ्यावर बलात्कार केला.”

ही गोष्ट आहे एका 31 वर्षांच्या एका भारतीय तरुणाची. ते लहान असताना एका धर्मगुरूनं त्यांचं लैंगिक शोषण केलं होतं. ती घटना, तो क्षण ते आजही विसरू शकलेले नाहीत. आणि 14 वर्षांत पहिल्यांदाच त्यांनी जगासमोर येऊन हा भयानक अनुभव व्यक्त केला आहे.

“त्यांने माझ्यावर आधीही दोनदा बलात्कार केला होता. त्यानं तिसऱ्यांदा बलात्कार केल्यानंतर मी, मला कमी दुखावं म्हणून दोन दिवस सतत स्वत:ला फिंगरिंग करत होतो. हे सगळ इतकं वेदनादायक होतं, की दोन दिवस मला नीट चालताही येत नव्हतं,” ते सांगतात.

तरीही या मुलाला काही झालंय याची त्यांच्या परिवाराला, नातेवाईकांना, मित्रांना किंवा शिक्षकांना दुर्दैवानं शंकासुद्धा आली नाही.

त्यांचे कुटुंबीय अनेकदा त्या धर्मगुरूंकडे जायचे. त्यामुळे जवळपास वर्षभर त्या धर्मगुरूनी या तरुणाचं लैंगिक शोषण केलं.

“ते क्षण आता आठवले तरी संताप होतो, अंगावर काटा उभा राहतो. कधीकधी मी रात्रभर झोपू शकत नाही. भिंतीवर जोरजोरात मारत राहतो,” ते सांगतात आणि त्यांना अश्रू अनावर होतात.

“मला खूप असहाय्य, लाचार वाटायचं. माझी काहीच चूक नसतानाही गेली १४ वर्षं मी हे सहन करतोय लाज वाटायची. गेल्या १४ वर्षांपासून ही गोष्टं मी कोणालाच सांगितली नव्हती, कारण आपल्या समाजात मुलाचं लैंगिक शोषण हा एका सामाजिक कलंक मानला जातो.”

भारतात प्रत्येक 15व्या मिनिटाला एका मुलाचं लैंगिक शोषण होतं. 2016 मध्ये 36,022 मुलांवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

ते पुढे सांगतात, “आपल्या समाजात पीडितालाच सगळा अपमान सहन करावा लागतो. माझी एवढीच इच्छा आहे, की मुलांना स्वत:ची सुरक्षितता जपण्याचं प्रशिक्षण देण्यात यावं, लहान वयात होणाऱ्या लैंगिक अत्याचाराला कसा विरोध करायचा, याची माहिती द्यायला हवी.”

लैंगिक अत्याचाराच्या अशाच एका केसमध्ये तो धर्मगुरू अडकला, तेव्हा या तरुणानंही तक्रार केली. मित्र-परिवाराकडून पाठिंबा मिळाला आणि ही गोष्ट सगळ्यांसमोर आली. त्यामुळे इतरांनाही व्यक्त होण्याचं बळ मिळालं.

पाहा त्याची कहाणी त्याच्या शब्दांतून.

निर्मिती - अमीर पीरझादा

शूटिंग आणि एडिटिंग - प्रेम भूमीनाथन

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)