पाहा व्हीडिओ : जेव्हा ड्रोन सिंह बनून हत्तींना पळवून लावतो...

तामिळनाडूत जंगलातून शहरांत येणाऱ्या हत्तींना पळवून लावण्यासाठी ड्रोन्सचा वापर केला जातो. हे ड्रोन्स सिंहाच्या डरकाळीचा आवाज निर्माण करत असल्याने हत्ती घाबरतात.

गरुडा एरोस्पेस कंपनीनं हे ड्रोन विकसित केले आहेत. एका ड्रोनसोबत २.५ किलो वजनाचा स्पीकर जोडलेला असतो. त्यातून माशांच्या घोंगावण्याचा किंवा सिंहाच्या डरकाळीचा आवाज येतो. त्यामुळे हत्ती घाबरुन मागे वळतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)