अवघड परिस्थितीत असलेल्या लोकांपर्यंत हा कॉन्सर्ट पोहोचवतोय संगीत
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : खूप आजारी लोकांना संगीतातून जगणं शिकवतोय हा कॉन्सर्ट

जे कॉन्सर्टला जाऊ शकत नाही, अशांपर्यंत 'Music for the Soul' हा ऑर्केस्ट्रा पोहोचतो.

अर्जेंटिनाचे चेलो वादक जॉर्ज बर्जरो यांचा हा ऑर्केस्ट्रा.

"संगीत माझ्यासाठी जगण्याचा, लोकांना जोडण्याचा मार्ग आहे. म्हणजे एकाप्रकारे संगीत हे माझं ऑक्सिजन होय," असं ते सांगतात.

त्यांना अशा कॉन्सर्टची प्रेरणा त्यांची गर्लफ्रेंड मारियाने दिली. तिचा स्तनाच्या कॅन्सरने मृत्यू झाला होता.

पण आता संगीतातून ते संघर्ष करणाऱ्यांना स्फूर्ती आणि ऊर्जा देण्याचं काम करत आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)