पाहा व्हीडिओ - IPLच्या चीअरलीडर्संचं आयुष्य कसं असतं?
IPL सामन्यासोबत चीअरलीडर्सचा डान्स बघण्याची प्रेक्षकांत एक वेगळीच क्रेझ असते. पण जगाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या या मुलींचं आयुष्य असतं तरी कसं?
या वर्षीच्या IPL सामन्याचा आता समारोप होत आहे. दरवेळी या सामन्यात चीअरलीडर्स आवर्जून दिसतात. आपल्याला त्या फक्त हसणाऱ्या आणि खेळणाऱ्या सुंदर मुली दिसत असतात, पण त्यांचही एक स्वत:चं विश्व आहे. या IPL खेळादरम्यान बीबीसीच्या टीमने वेगवेगळ्या देशातून आलेल्या चीअरलीडर्सशी चर्चा केली.
चीअरलीडिंग काम मेहनतीचं
"मी इथं चीअरलीडिंग करते. मी प्रोफेशनल डान्सर आहे. याआधी मी मेक्सिकोमध्ये सहा महिने डान्स आणि थिएटरमध्ये काम केलं आहे," असं ऑस्टेलियाच्या कॅथरीन सांगतात.
"चिअरलीडिंग काही फालतू काम नाही. मी त्याला एक खेळाचा प्रकार मानते. चीअरलीडिंग करताना एकदा माझ्या बरगड्या मोडल्या होत्या," असं डियान बॅटमन सांगतात. त्या ब्रिटनमधल्या मँचेस्टरहून आल्या आहेत. त्यांना हे अधिक जोखमीचं आणि मेहनतीचं काम वाटतं.
"लोकांच्या एक गोष्ट लक्षात येत नाही. ते फक्त आम्हाला हसताना आणि डान्स करतानाच बघतात. पण क्रिकेटपटूंएवढीच एवढीच आम्हीपण मेहनत घेतो." असं त्यांनी सांगितलं.
'चीअरलीडर्स या सेक्स ऑब्जेक्ट नाहीत'
"स्टेजवर डान्स करताना आमच्याकडे एक सेक्स ऑब्जेक्ट म्हणून बघू नये. तो आमचा जॉब आहे. आम्ही डान्सर मुली असून कुणाची उपभोग्य वस्तू नाही," असं आयर्लंडच्या डाराह किव्हनी सांगतात.
ऑस्टेलियाच्या आएला सांगतात, "मी गेल्या 8 वर्षांपासून डान्स करतेय. मेहनतीच्या बदल्यात म्हणावसा पैसा मिळत नाही. पण माझ्यासाठी डान्स हा जगातलं एक भारी प्रोफेशन आहे."
'मला समोसा खूप आवडतो'
या परदेशी मुलींना बोलण्यातून त्यांना भारतीय पदार्थांची गोडी लागलेली दिसते आहे. आयर्लंडच्या डाराह यांना इथला समोसा खूप आवडतो. लोकांना धन्यवाद देताना त्या हिंदीत 'शुक्रिया' असं म्हणतात.
व्हीडिओ रिपोर्ट : सूर्यांशी पांडे, शूट-एडिट : शारिक अहमद
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)